देशात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वेगाने पसरत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. दरम्यान आज(शुक्रवार) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री  व भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

जावडेकर यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. मी करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया स्वतःची तपासणी करून घ्यावी. असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

Coronavirus : पुण्यातील आढावा बैठकीनंतर जावडेकरांनी दिली महत्वपूर्ण माहिती, म्हणाले…

दरम्यान, ”ऑक्सिजन मिळण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे मनुष्यबळ टेस्टिंग, ट्रॅकींग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी लागणार आहे. ते मनुष्यबळ घेण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनमधून केंद्र सरकार पैसे देणार आहे. कारण, आम्ही असं मानतो हे राष्ट्रीय संकट आहे. सगळी राज्य सगळी जनता आमचीच आहे. त्यामुळे जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे जास्त लक्ष आणि उपाय अशा स्वरूपाचं धोरण आहे.” अशी माहिती जावडेकर यांनी १० एप्रिल रोजी पुण्यातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली होती.

सरसंघचालक मोहन भागवतांनी केली करोनावर मात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी करोनावर मात केली आहे. उपचारानंतर बरे झाल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. ९ एप्रिलला मोहन भागवत यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना किंग्जवे या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान डॉक्टरांनी मोहन भागवत यांना पुढील पाच दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.