News Flash

असा आहे राम विलास पासवान यांचा राजकीय प्रवास

बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते...

बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते आणि लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष राम विलास पासवान यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

राम विलास पासवान यांचा राजकीय प्रवास

– राम विलास पासवान यांनी आठवेळा लोकसभेवर बिहारचे प्रतिनिधीत्व केले. सध्या ते राज्यसभेतून खासदार होते.

– संयुक्त समाजवादी पक्षातून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. १९६९ साली पहिल्यांदा ते बिहार विधानसभेवर निवडून गेले.

– १९७४ साली त्यांनी लोक दलमध्ये प्रवेश केला आणि सरचिटणीस बनले.

– १९७५ मध्ये त्यांनी आणीबाणीला विरोध केला. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले.

– १९७७ साली जनता पार्टीच्या तिकिटावर हाजीपूर मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली.

– त्यानंतर १९८०, १९८९, १९९६, १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये त्यांनी लोकसभेमध्ये बिहारचे प्रतिनिधीत्व केले.

– २००० साली राम विलास पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली.

– २००४ साली त्यांनी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते रसायन आणि खत मंत्री होते.

– २००४ साली राम विलास पासवान यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली पण २००९ साली ते पराभूत झाले.

– २०१० साली ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांनी हाजीपूरमधून पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकली.

– २०१४ पासून ते भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये होते. मोदी सरकारमध्ये दुसऱ्यांदा त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 9:17 pm

Web Title: union minister ram vilas paswan passes away know about his political career dmp 82
Next Stories
1 केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
2 “ट्रम्प हे खरे ‘जुमलेबाज’ आहेत, तुम्हाला ठाऊकच असेल कोणासारखे”
3 ‘पंतप्रधान मोदींनी स्वत:साठी ८,४०० कोटीचे विमान विकत घेतले, इतक्या पैशात तर…’
Just Now!
X