13 August 2020

News Flash

शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना स्मृती इराणींनी पोस्ट केला चुकीचा फोटो

काँग्रेसने यावरुन स्मृती इराणींवर टीका केली आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असल्याने अनेक नेत्यांनी त्यांचे फोटो पोस्ट करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाकण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो पोस्ट केला आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ज्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. स्मृती इराणींना त्यांची चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो असलेलं ते ट्विट डिलिट केलं. मात्र मुंबई काँग्रेसने या ट्विटचा स्क्रीन शॉट काढून स्मृती इराणींना टोला लगावला आहे.

Next Stories
1 भरदिवसा बँकेवर दरोडा, आठ लाख लुटले; घटनेचा व्हिडिओ आला समोर
2 ‘प्रियकर स्वप्नात येतोय, त्याला बाहेर काढा’ प्रेयसीने आई-वडिलांसमोर दिली हत्येची कबुली
3 छत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा
Just Now!
X