27 September 2020

News Flash

मुलीला चिडवणाऱ्यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी झापले

मी जोइशची आई आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, तिला किती त्रास द्या ती सक्षमपणे उत्तर देईल असंही स्मृती इराणींनी म्हटलं आहे

मुलीला सेल्फीवरून चिडवणाऱ्यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी झापले आहे. इंस्टाग्रामवर खरमरीत पोस्ट लिहून त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. स्मृती इराणी यांनी त्यांच्या मुलीसोबत म्हणजेच जोइश इराणीसोबत एक सेल्फी इंस्टा अकाऊंटवर पोस्ट केला होता.
या फोटोमध्ये तुझा लुक चांगला नाही असं म्हणत काही विद्यार्थ्यांनी जोईशला चिडवलं. ज्यानंतर जोईशने आपल्या आईला म्हणजेच स्मृती इराणी यांना तो सेल्फी डिलिट करण्याची विनंती केली. या पोस्टनंतर स्मृती इराणी यांनी फोटो डिलिट केला. मात्र मुलीला चिडवणाऱ्यांना त्यांनी तिखट शब्दात सुनावले आहे.

 

View this post on Instagram

 

I deleted my daughter’s selfie yesterday coz an idiot bully in her class ,A Jha ,mocks her for her looks & tells his pals in class to humiliate her for how she looks in her mother’s insta post. My child pleaded with me ‘ Ma please delete it, they are making fun of me’. I obliged coz I could not stand her tears. Then I realised my act just supported the bully . So Mr Jha , my daughter is an accomplished sports person, record holder in Limca Books, 2 Nd Dan black belt in Karate, at the World Championships has been awarded bronze medal twice; is a loving daughter and yes damn beautiful. Bully her all you want , she will fight back. She is Zoish Irani and I’m proud to be her Mom ❤️

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

ए झा नावाचा एक मूर्ख माझ्या मुलीला तिच्या लुकवरून चिडवत होता. सोबत तो त्याच्या मित्रांनाही सांगत होता की जोइशच्या आईच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जा आणि तिला अपमानित करा. मात्र चिडवणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की ती जोइश इराणी आहे. ती एक चांगली खेळाडू, एक गुणी मुलगी आहे. लिम्का बुकमध्ये तिचे नाव नोंदवण्यात आलं आहे. ती कराटे ब्लॅक बेल्ट आहे, जागतिक पातळीवरच्या चॅम्पियनशिपमध्ये तिला दोनवेळा कांस्यपदकही मिळाले आहे. तुम्ही कितीही त्रास द्या ती सक्षमपणे सामना करेल. जोइश इराणीची आई असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असं म्हणत स्मृती इराणी यांनी ट्रोल करणाऱ्यांना आणि टीकाकारांना झापलं आहे.

मी इंस्टाग्रामवरून आमचा सेल्फी डिलिट केला आहे कारण मुलीच्या डोळ्यातले अश्रू मी पाहू शकत नाही. असं असूनही ती हरली आहे असं कुणीही समजू नये असंही स्मृती इराणींनी बजावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 3:57 pm

Web Title: union minister smriti irani slams her daughters trollers and write post to instagram scj 81
Next Stories
1 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
2 ट्रेनर विमान खरेदीत ३३९ कोटीचा भ्रष्टाचार, सीबीआयकडून संजय भंडारी विरोधात FIR दाखल
3 दिल्लीतील भाजपा मुख्यालय बॉम्बने उडवू, धमकीचा निनावी फोन
Just Now!
X