केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुलवामा येथील शहीद जवानांच्या पार्थिवांना खांदा दिला. त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंगही होते. पुलवामा गुरुवारी दहशतवादी हल्ल्याने हादरलं. या हल्ल्यात ३९ जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची पार्थिवं बुडगाम या ठिकाणी आणण्यात आली. त्यावेळी देशाचे गृहमंत्री आणि जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक या दोघांनीही जवानांच्या पार्थिवांना खांदा दिला.

पहा व्हिडिओ

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून निषेध होतो आहे. या जवानांची पार्थिवं ज्यावेळी आणण्यात आली तेव्हा सगळा देश हळहळला. या जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला, त्याआधी केंद्रीय गृहमंत्र्यांनी या पार्थिवांना खांदा दिला. या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर द्या अशी मागणी होते आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. पुढील कारवाई कुठे करावी, त्याची वेळ काय असणार आणि ठिकाण कोणते असेल, त्याचे स्वरुप काय असेल, हे ठरवण्याची जबाबदारी आम्ही सैन्याकडेच सोपवली आहे, असे मोदींनी सांगितले. पुलवामामधील गुन्हेगारांना शिक्षा मिळणारच. हा नवीन विचारधारा आणि धोरण राबवणारा देश आहे, हे पाकने विसरु नये, असेही त्यांनी पाकला सुनावले.