04 June 2020

News Flash

जम्मू-काश्मीरला केंद्रीय मंत्र्यांचा गट भेट देणार

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० पाच ऑगस्ट रोजी रद्द केल्यानंतर तेथे निर्बंध लागू करण्यात आले होते, तेथे अजूनही जनजीवन विस्कळीत असून हा अनुच्छेद रद्द करण्यामुळे झालेल्या सकारात्मक परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारचा मंत्रिगट या महिन्यात जम्मू-काश्मीरला भेट देणार आहे.

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट व मोबाइल निर्बंध अजूनही कायम असून त्यांचा आढावा घेण्याचा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने इंटरनेट सेवा हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यानच्या काळात युरोपीय खासदारांनी जम्मू- काश्मीरला भेट देऊन सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा दिला होता पण त्यांच्यातील चार खासदार काश्मीरला न जाता दिल्लीतूनच मायदेशी परतले होते. अलीकडे अमेरिकेच्या राजदूतांसह अनेक राजदूतांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली असून त्यांनी तेथील स्थिती सुरळित असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारचे मंत्री आता जम्मू-काश्मीरला भेट देऊन सकारात्मक बाबींवर जनजागृती करणार असून त्याबाबतचा निर्णय १७ जानेवारीला मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने मंत्रिगटाचा हा दौरा होणार असून गृह मंत्रालयच त्यात समन्वय करीत आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे १९ जानेवारीला  जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2020 1:29 am

Web Title: union ministers to visit jammu and kashmir zws 70
Next Stories
1 झाकीर नाईक याच्या दाव्याबाबत स्पष्टीकरणाची मागणी
2 उन्नाव बलात्कार: कुलदीप सेंगरने आजीवन कारावासाच्या शिक्षेला हायकोर्टात दिले आव्हान
3 जवानांबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुलचा टॉप दहशतवादी ठार
Just Now!
X