23 September 2020

News Flash

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा सर्वसामान्यांवर प्रभाव पडत नाही – धर्मेंद्र प्रधान

धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून इंधनाच्या वाढत्या दराचं समर्थन

संग्रहित (PTI)

एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने त्याचा सर्वसामान्यांवर काही प्रभाव पडत नाही असं म्हटलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे. इंधनाच्या दरात सतत वाढत होत असून गेल्या २३ दिवसात २२ वेळा दर वाढले आहेत. यामुळे काँग्रेसकडून अनेक राज्यांमध्ये आंदोलनही केलं जात आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनाच्या वाढत्या दरांचं समर्थन करताना म्हटलं की, “जागतिक स्तरावरही खूप मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. यामुळे जगभरात इंधनाच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे एप्रिल आणि मे महिन्यात इंधनाच्या मागणीत ७० टक्के घट झाली आहे. पण आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मागणी होत आहे”.

अशा परिस्थितीतत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा प्रभाव सर्वसामान्यांवर पडलेला नाही असं धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितलं. “जेव्हा कुटुंबात एखादी समस्या येते तेव्हा भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आर्थिक नियोजन केलं जातं. इंधनाच्या वाढत्या दराकडे तसंच पाहिलं गेलं पाहिजे,” असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

“इंधनामधून मिळणारा कर महसूल देशातील लोकांच्या आरोग्य, रोजगार आणि आर्थिक सुरक्षेसाठी वापरला जात आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी इंधनाच्या वाढत्या दरावरुन देशभरात आंदोलन केल्याबद्दल काँग्रेसवरही टीका केली. सोनिया गांधी आणि काँग्रेसला गरीब लोकांचं भलं झालेलं पहावत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 7:40 am

Web Title: union petroleum minister dharmendra pradhan says common man not impacted by rising petrol diesel price sgy 87
Next Stories
1 मोफत धान्य नोव्हेंबरपर्यंत
2 संभाव्य लसीचा पहिला लाभ करोनायोद्धय़ांना!
3 करोनाचे ६० टक्के रुग्ण ठणठणीत
Just Now!
X