News Flash

माहितीपट सरकार,बीबीसीमधील खासगी वाद

नवी दिल्लीत १६ डिसेंबर २०१३ रोजी धावत्या बसमध्ये युवतीवर झालेल्या बलात्कारावरील माहितीपटातील काही मुद्दय़ांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्व आहे.

| March 13, 2015 01:06 am

नवी दिल्लीत १६ डिसेंबर २०१३ रोजी धावत्या बसमध्ये युवतीवर झालेल्या बलात्कारावरील माहितीपटातील काही मुद्दय़ांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्व आहे. परंतु या माहितीपटावर भारत सरकारने देशातील प्रसारणावर घातलेली बंदी हा त्या संबंधित वृत्तवाहिनी आणि सरकारमधील ‘खासगी वाद’ आहे, असे स्पष्टीकरण ब्रिटन सरकारने गुरुवारी दिले.
भारतातील महिलांच्या संपूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या उपाययोजना केंद्र सरकारने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील, असे इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री फिलीप हॅमंड यांनी सांगितले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा चर्चेत उपस्थित केल्यास ब्रिटनची काय भूमिका असेल, या प्रश्नावर हॅमंड म्हणाले, की याविषयी आमचे कोणाशीही बोलणे झालेले नाही आणि अद्याप कोणीही यावर आमच्याशी चर्चा केलेली नाही.
बीबीसी वृत्तवाहिनीने तयार केलेला माहितीपट देशात दाखवायचा की नाही, याचा सर्वस्वी निर्णय भारत सरकारवर आहे. बीबीसी वाहिनी आणि भारत सरकार यांच्यातील खासगी वादाचीही आपल्याला कल्पना आहे, असे हॅमंड म्हणाले. भारतात अत्यंत निर्घृणरीत्या एका युवतीला मारले जाते, ही खचितच अत्यंत वाईट घटना आहे, परंतु त्यातील क्रौर्याची माहिती जगाला कळण्यासाठी हा माहितीपट उपयोगी ठरेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

इंग्लंडमध्येही रोज २५० बलात्कार
दिल्लीतील युवतीवरील बलात्कारावरील माहितीपटावर केंद्र सरकारने बंदी घातण्याच्या निर्णयानंतर एका भारतीयाने ‘युनायटेड किंग्डम्ज डॉटर’ नावाचा माहितीपट तयार केला असून यात पाश्चिमात्य देशांमध्ये मुलींवर कसे बलात्कार केले जातात, याचा उलगडा केला आहे. हरविंदर सिंग हा माहितीपट तयार केला आहे.  हरविंदर याने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडमध्ये दररोज २५० बलात्कार होतो. इंग्लंडमधील दोन तृतीयांश नागरिक हे बलात्कारास उद्युक्त करण्यास महिलाच जबाबदार असल्याचे मानतात. पाश्चिमात्य देशांत बलात्कारास महिला रोखत नाहीत. त्यामुळे येथे महिलांच्या हत्येचेही प्रमाण कमी आहे. त्यामुळे इंग्लंडसारख्या देशाने सज्जन असल्याचे मानू नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2015 1:06 am

Web Title: united kingdoms daughters a response to bbcs documentary
Next Stories
1 सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी तरार यांचाही जबाब होणार
2 मॉरिशसला भारताकडून ५० कोटी डॉलरचे कर्ज
3 अपक्षांना निवडणुकीस बंदी घाला
Just Now!
X