भारत लवकरच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा कायमचा सदस्य होईल असा विश्वास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला. त्या राज्यसभेत बोलत होत्या. गेल्या काही वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत या प्रयत्नात लवकरच यशस्वी होईल असे सुषमा स्वराज यांनी म्हटले. या वर्षी भारत नक्कीच सुरक्षा परिषदेचा सदस्य होईल. जर या वर्षी नाही झाला तर पुढील वर्षी होईल परंतु भारत नक्की सुरक्षा परिषदेचा सदस्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताजवळ पूर्ण क्षमता आहे. भारताला मिळालेली पूर्ण जबाबदारी पार पाडण्यास भारत समर्थ आहे असे त्यांनी म्हटले. राज्यसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या काळात त्यांनी हे वक्तव्य केले. अमेरिका, इंग्लंड, फ्रांस आणि रशिया या चार देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. तर चीनने अद्याप आपल्याला उघडपणे विरोध केला नाही असे सुषमा स्वराज यांनी म्हटले त्यामुळे या पाचही सदस्यांच्या सहाय्याने आपण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे सदस्य होऊ असे त्या म्हणाल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 10:55 pm