News Flash

भारतानंतर अमेरिकाही टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत

टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा अमेरिकेचाही विचार

भारताने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकादेखील ही बंदी घालण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, माइक पोम्पिओ यांनी अमेरिका टिकटॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे. “आत्ता या विषयावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झालेली नाही, काही ठरलेलं नाही. परंतु ही बाब अशी आहे की आम्ही निश्चितच विचार करत आहोत”, असं माइक पोम्पिओ यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

भारताकडून ५९ अ‍ॅपवर बंदी
केंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटलं. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 10:15 am

Web Title: united states is certainly looking at banning chinese social media apps including tiktok sgy 87
Next Stories
1 आम्ही तुमच्या पाठिशी: चीनविरोधी संघर्षात अमेरिकी लष्कराची भारताला साथ
2 चिंतेत वाढ! भारतातील करोनाबळी २० हजारांच्यापुढे
3 PoK मध्ये चीनविरोधात निदर्शन, लोकांनी रस्त्यावर उतरुन दिल्या घोषणा
Just Now!
X