News Flash

मंगळावरील पर्वत तयार होण्यात वाऱ्यांचाही मोठा हातभार

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील ऑस्टिन जॅक्सन स्कूल ऑफ जिओसायन्सेसचे संशोधन

| April 3, 2016 01:45 am

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील ऑस्टिन जॅक्सन स्कूल ऑफ जिओसायन्सेसचे संशोधन
मंगळावरील काही मैल उंचीचे पर्वत हे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अब्जावधी वर्षांपूर्वी तयार झाले आहेत, असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. मंगळावरील वातावरणात पाणी नष्ट करणारे बदल कसे घडत गेले याबाबतचे हे संशोधन आहे. टेक्सास विद्यापीठातील ऑस्टिन जॅकसन स्कूल ऑफ जिओसायन्सेस या संस्थेच्या श्रीमती मॅकेन्झी डे यांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले, की मंगळावरील पृष्ठभूमीवरील डोंगर दऱ्या यांच्या निर्मितीत वाऱ्याचे मोठे महत्त्व होते. मंगळावर पृथ्वीसारख्या टेक्टॉनिकचा संबंध नाही. तेथे पाणी नाही पण तरीही तेथे मोठे पर्वत तयार होऊ शकले, त्यातून वाऱ्यांनी तेथील भूपृष्ठाच्या रचनेत मोठी भूमिका पार पाडली आहे. पृथ्वीवर वाऱ्यामुळे असे घडत नाही कारण पाणी फार वेगाने काम करीत असते, टेक्टॉनिकचा मोठा परिणाम असतो. त्यांनी सांगितले की, नासाच्या १९७० मधील व्हायकिंग या पहिल्या यानामुळे तेथील विवरात पर्वत असल्याचे दिसून आले. अलीकडच्या विश्लेषणानुसार क्युरिऑसिटी गाडीने माउंट शार्प हा गेल विवरातील तीन मैल उंचीचा पर्वत शोधला आहे. यातील काही पर्वत हे खडकांचे बनले आहेत. पाण्याबरोबर विवरांमध्ये गाळ वाहत आला, त्यातून पर्वत बनले पण या पर्वतांचा वरचा भाग वाऱ्यामुळे तयार झाला आहे. वाऱ्याने केलेल्या क्षरणामुळे हे पर्वत तयार झाले व ते अब्जावधी वर्षांपूवी बनले असे सांगितले जाते. पण वाऱ्यामुळे ते नेमके कसे तयार झाले यावर आमचे संशोधन आधारित आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, त्यासाठी ४ सेंटीमीटर खोलीचे व ३० सेंटीमीटर व्यासाचे विवर तयार करून त्यात वाळू भरण्यात आली व ते वाऱ्याच्या झोतात ठेवण्यात आले, तेव्हा वाळूची रचना वेगळी दिसली. मंगळावरील विवरात अशीच क्रिया घडून पर्वत तयार झाले. वायुगतिकी समजण्यासाठी यात संगणक सादृश्यीकरणाचा वापर करण्यात आला व त्यातून वाऱ्यामुळे पृष्ठभागाचे क्षरण होऊन पर्वत कसे बनले असावेत हे दाखवण्यात आले. मंगळावर पाणी असताना या पर्वतांचा पाया तयार झाला, पण त्यांचा वरचा भाग पाणी नसताना बनला असावा. मंगळावरील ३.७ अब्ज वर्षांपूर्वीच्या नोआशियन काळाचा वेध यात घेतला असून त्या वेळी मंगळ ओल्याचा कोरडा व्हायला सुरूवात झाली होती. तेथील तीस पर्वतांचे निरीक्षण करून वैज्ञानिकांनी हवामानातील बदलांचा त्यांच्या निर्मितीशी संबंध लावला आहे. हे संशोधन जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2016 1:45 am

Web Title: united states texas university jackson school of geosciences
Next Stories
1 भारतमातेचा जयघोष करण्याचा प्रत्येकाला अधिकार – इराणी
2 मोदी, ममतांचा लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न!
3 ‘सत्ताधारी पक्षाविरोधात मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य धोक्यात’
Just Now!
X