उद्या ३१ मे रोजी लॉकडाउन 4.0 संपत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे आतातरी लॉकडाउनमधून मुक्तता मिळणार? हाच प्रश्न सर्वांना पडला होता. त्या दृष्टीने केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता टप्प्याटप्प्याने देशातील सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्या संदर्भात मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आली आहेत. केंटन्मेंट झोनबाहेर टप्प्याटप्प्याने सर्व सुरु होणार आहे.
पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.
दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील. पालकांसह सर्व संबंधितांचे याबद्दल मत जाणून घेण्यात येईल. जुलै महिन्यात या संदर्भात निर्णय होईल.
तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन, व्यवस्थित आढावा घेऊन रेल्वे, हवाई प्रवास कधी सुरु करायचा त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 30, 2020 8:05 pm