25 February 2021

News Flash

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कार अपघाताची होणार CBI चौकशी

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कारला रविवारी अपघात झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कारला रविवारी अपघात झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी सरकारला याबद्दल कळवले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जाणार आहे. केंद्र सरकारला अद्यापपर्यंत यासंबंधी पत्र पाठवलेले नाही.

उन्नावमधील या बलात्कार प्रकरणात भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर मुख्य आरोपी आहे. रविवारी पीडित तरुणीच्या कारला रायबरेलीमध्ये एका ट्रकने धडक दिली. कारमध्ये पीडित तरुणीसह तिचा वकिल आणि दोन काकी सोबत होत्या. पीडित तरुणी आणि वकिल गंभीर जखमी झाले असून दोन्ही काकींचे निधन झाले आहे. पीडित तरुणी कुटुंबियांसह रायबरेलीच्या तुरुंगात असलेल्या काकांना भेटण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.

पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी एक बंदुकधारी पोलीस आणि दोन महिला कॉन्स्टेबल तैनात असतात. अपघाताच्यावेळी मात्र ते तिच्यासोबत नव्हते असे उन्नावचे पोलीस अधीक्षक एमपी वर्मा यांनी सांगितले. अपघातानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा ट्रकची नंबर प्लेट काळयारंगाने रंगवण्यात आलेली होती. पीडित तरुणीच्या आईने अपघातासाठी कुलदीप सिंह सेनगरला जबाबदार धरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 3:04 pm

Web Title: unnao rape survivors accident case cbi to investigate dmp 82
Next Stories
1 काँग्रेसने अध्यक्ष निवडीसाठी ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाची शैली स्विकारावी : शशी थरुर
2 चांद्रयान २ : चंद्रावर पाच एकरांचा प्लॉट विकत घेणाऱ्याच्या आशा पल्लवित
3 ‘माझी संपत्ती जप्त केली जाऊ नये’, मल्ल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Just Now!
X