28 September 2020

News Flash

उन्नाव बलात्कार पीडिता अपघातात गंभीर जखमी, कारला ट्रकने उडवले

आई, काकूसह कारचालकाचा मृत्यू

भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर आरोप करणारी उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरूणी अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात पीडित तरूणीच्या आई व काकूसह  वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. तर, पीडित तरूणी आणि तिच्या वकीलास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना लखनऊ येथील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित तरूणी कुटुंबासह रायबरेली तरूंगात असलेल्या आपल्या काकाची भेट घेऊन परत येत असताना हा अपघात घडला. त्यांच्या कारला ट्रकने उडवल्याने हा भयानक अपघात झाला. काँग्रेसने या अपघाताबाबत संशय व्यक्त केला असून, उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या आमदार आराधना मिश्रा यांनी याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. गुरबख्श गंज परिसरात विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. ही धडक एवढी भीषण होती की, घटनास्थळी कारचा अक्षरशा चुराडा झाला. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून ट्रक ताब्यात घेण्यात आलेला आहे. फरार ट्रक चालकासह ट्रकच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहे.पीडित तरूणीच्या बहिणीने या अपघातमागे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या माणसांचा हात असल्याचा आरोप केला आहे. घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेंसिक टीम घटनास्थळी रवाना झालेली आहे.

मागच्यावर्षी नोकरीच्या निमित्ताने १७ वर्षीय पीडित तरुणी कुलदीप सिंह सेंगरला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने बलात्कार केला असा आरोप तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच तिच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 10:13 pm

Web Title: unnao woman who accused bjp mla of rape injured in accident mother aunt dead msr 87
Next Stories
1 उद्या शंभर टक्के बहुमत सिद्ध करणार – मुख्यमंत्री येडियुरप्पा
2 घरात घुसून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची हत्या, अमेठीतील धक्कादायक घटना
3 तिने ज्वालामुखीत उतरुन वाचवले पतीचे प्राण
Just Now!
X