अलिकडेच झालेला पाऊस व गारपिटीमुळे १.३० कोटी टन गव्हाचे नुकसान झाले असून सरकारला आता गव्हाची आयात करावी लागण्याची शक्यता आहे. गव्हाचे नुकसान झाल्याने तूट भरून काढण्यासाठी आयात करावी लागेल, असे अ‍ॅसोचेमच्या अहवालात म्हटले आहे. अ‍ॅसोचेमचे सरचिटणीस डी.एस.रावत यांनी गव्हावरील सध्याचे १० टक्के आयात शुल्क पाच टक्के करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे खासगी आयातही वाढू शकेल व गव्हाच्या किमती वाढणार नाहीत. देशात १.३० कोटी टन गहू कमी पडणार असून आधी ९.३८ कोटी टन उत्पादन अपेक्षित होते पण आता ते कमी होणार आहे.