06 August 2020

News Flash

विकृती! उद्यानाबाहेर महिलांसमोर उघडली pantchi chain आणि…

अश्लील कृती, हातवारे, इशारे करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

सार्वजनिक ठिकाणी महिलांना पाहून अश्लील कृती, हातवारे, इशारे करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बंगळुरुमध्ये एक विकृत इसम त्याच्या पँटची चैन खोलून महिलांना त्याचे गुप्तांग दाखवत होता. बंगळुरुच्या सांगोल्ली रायान्ना पार्क जवळच्या मुख्य रस्त्यावर गुरुवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पारमेश असे या विकृताचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

पारमेश पँटची चैन खोलून रस्त्यावर फिरताना महिलांकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. पारमेश खांबाला टेकून सिगरेट ओढत उभा असताना पार्कातून बाहेर पडणाऱ्या महिलांकडे अत्यंत अश्लील नजरेने पाहत असल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे.

मागच्या काही दिवसांपासून आरोपी या पार्कमध्ये येऊन महिलांना त्रास देत होता असे इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी सुब्रमण्यमगनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणी तपास करत असून त्यांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2018 2:04 pm

Web Title: unzips his pants flashes at women
Next Stories
1 ‘अर्थ अवर’ : जगभरात आज रात्री एका तासासाठी लाईट होणार गुल
2 नीरव मोदीची १० कोटींची हिऱ्याची अंगठी, दीड कोटींची घडयाळं जप्त
3 काय म्हणाले होते इलॉन मस्क फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बुद्धिमत्तेबद्दल
Just Now!
X