कायद्यापुढे कुणी छोटं किंवा कुणी मोठं नसतं. कायदा सर्वांनाच समान असतो याची प्रचिती उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यात आली. करोनाचा वाढता फैलाव पाहता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मास्क न घालण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला समज दिली जात आहे. तसंच त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे. पोलिसांची कारवाई व्यवस्थित सुरु आहे की नाही, तसेच नागरिकांना समज देण्यासाठी कागारौल पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले होते. मात्र त्यानीच नियमांची पायमल्ली केल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. नागरिकांनी ही बाब वरिष्ठापर्यंत पोहोचवली आणि तक्रारीनंतर पोलीस निरीक्षकाकडून दंड वसूल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक दिलावर यांचा व्हिडिओही दुकानदारांनी तयार केला आहे. त्यात दुकानदार आणि त्यांच्यात बाचाबाची होत असल्याचं दिसत आहे. त्यांनी मास्क घातला नसल्याने नागरिकांनी त्यांना चांगलंच खडसावल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन

उत्तर प्रदेशात करोना रोखण्यासाठी साप्ताहीक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व बाजार बंद असणार आहेत. पोलीस अधिकारी दिलावर विनावर्दी बाजार बंद करण्यासाठी गेले होते. त्यात त्यांनी मास्कही घातला नव्हता. नियमांची पायमल्ली झाल्याचं दुकानदारांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ पोलीस अधिकाऱ्याला खडसावलं आणि व्हिडिओ तयार केला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली.

“शमशान और कब्रिस्तान दोनों…”; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

व्हिडिओ पाहिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत कारवाई केली आहे. मास्क न घातल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच विनावर्दी फिरल्याने विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत.