उत्तर प्रदेशमधील अलिढमध्ये विषारी दारू प्यायल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आताही काही जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विषारी दारूमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ५ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर आरोपी ऋषी शर्मा आणि मुनिष यांच्या ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी ५०-५० हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

विषारी दारूमुळे लोधा भागातील करसुआ, निमाना, अंडला आणि हेवतपूर गावातील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबियांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महसूल विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

“या प्रकरणी मॅजिस्ट्रेट चौकशीचे आदेश देण्याते आले आहेत. याचा तपास अप्पर जिल्हाधिकारी स्तरावर एक अधिकारी करेल. दोषींविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत”, असं अलिगढ जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

भोपाळ : ‘एफसीआय’ लिपीकाच्या घरी ‘सीबीआय’चा छापा; २.१७ कोटींसह ८ किलो सोनं हस्तगत!

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस आणि अधिकाऱ्यांनी देशी दारूचे अड्डे सील केले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.