News Flash

बुद्ध, महावीरांसंदर्भातील विधानाप्रकरणी राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

चित्रांमध्ये काँग्रेसचे चिन्ह पाहिल्याचे केले होते विधान

काँग्रेस उपाध्यक्ष (संग्रहित छायाचित्र)

शिव जी, बुद्ध आणि महावीरांच्या चित्रांमध्ये काँग्रेसचे चिन्ह पाहिल्याचा दावा करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अडचणीत आले आहेत. उत्तरप्रदेशमधील भाजप नेत्यांनी या विधानाप्रकरणी राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

नोटाबंदीविरोधात काँग्रेसने जनवेदना अधिवेशनाचे आयोजन केले होते. या अधिवेशनात राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या चिन्हावर भाष्य केले होते. शिव जी, गुरुनानक, बुद्ध आणि महावीरांच्या चित्रांमध्ये मी काँग्रेसचे चिन्ह (हात) पाहिले. याचा अर्थ काय? घाबरू नका. डरो मत! काँग्रेसची ही विचारधारा आहे आणि त्यांची (भाजप- संघपरिवाराची) घाबरा आणि घाबरून टाका.. हा दोन विचारधारांचा संघर्ष आहे,’ असे ते म्हणाले होते.
राहुल गांधी यांच्या या विधानाविरोधात उत्तरप्रदेशमधील भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी धार्मिक विधान केले असून याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी भाजपची मागणी आहे. राहुल गांधी यांच्या विधानातून लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने धर्म आणि जातीच्या आधारे होणा-या राजकारणावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. नेत्यांना धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर मत मागता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. हिंदूत्वच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या विविध याचिकांवर ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला होता. निवडणूक ही धर्मनिरपेक्ष प्रक्रीया असते आणि त्याचे पालन केलेच पाहिजे असेही कोर्टाने म्हटले होते. भाजपने या निर्णयाच्या आधारेच निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे समजते.

दरम्यान, जनवेदना अधिवेदना अधिवेशनात राहुल गांधी भाजपवर घणाघाती टीका केली होती. ‘अच्छे दिना’च्या भूलथापा देऊन मोदींनी जनतेला गंडविले. पण मी तुम्हाला खात्री देतो. देशाला खरोखरच ‘अच्छे दिन’ येतील पण २०१९ मध्ये.. जेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल. हीच जनता मोदींना हटविल्याशिवाय राहणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 11:10 pm

Web Title: up bjp delegation complaint to election commission against rahul gandhi
Next Stories
1 बीएसएफच्या जवानाचे जेवणाच्या दर्जाविषयीचे आरोप निराधार, गृहमंत्रालयाचा पीएमओला अहवाल
2 चंद्रशेखरन टाटा समुहाला नव्या उंचीवर नेतील: रतन टाटा
3 राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते उपराष्ट्राध्यक्षांना बहुमान
Just Now!
X