नव्या मोटार वाहतूक कायदा १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला आहे. या नव्या कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता या नवीन नियमांप्रमाणे होणाऱ्या दंडासंदर्भातील अनेक बातम्या समोर येत आहेत. अशीच एक बातमी आता उत्तर प्रदेमधील अलीगढमधून समोर आली आहे. येथील एका व्यक्ती चक्क हेल्मेट घालून चारचाकी गाडी चालवत आहे. या व्यक्तीचे नाव आहे पियुष वार्ष्णेय असे आहे.
२७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याप्रकरणी ई-चालानच्या माध्यमातून पियुषला ५०० रुपयांचा दंड केला. मात्र ज्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली तेव्हा तो चारचाकी गाडी चालवत होता. घरी आलेल्या दंडाच्या पावतीवर माझ्या गाडीचा क्रमांक आणि दंड कशाबद्दल केला आहे याबद्दल स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे असं पियुष सांगतो. याचमुळे आता या दंडात्मक कारवाईविरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी पियुष चक्क हेल्मेट घालून चारचाकी चालवतो.
‘मी चारचाकी चालवताना हेल्मेट घालते नव्हते म्हणून मला दंड करण्यात आल्याचे दंडाच्या पावतीवर नमूद करण्यात आले होते. असा दंड मला पुन्हा होऊ शकतो. त्यातच नवीन वाहतूक नियम लागू झाल्यामुळेच दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. म्हणूनच तो टाळण्यासाठी मी हेल्मेट घालून माझी गाडी चालवतो. गाडी माझ्या वडिलांच्या नावाने आहे. त्यामुळे काही कारवाई झाल्यास ते वयस्कर असल्याने ते वाहतूक कार्यालयात येऊ शकत नाही. म्हणून मीच हेल्मेट घालून गाडी चालवतो,’ असं पियुषने ‘द इकनॉमिक टाइम्स’शी बोलताना सांगितले.
‘पोलीस खात्याकडून चुकून पियुषला दंड करण्यात आला. यासंदर्भात चौकशी करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. अनेकदा डेटा कलेक्ट करताना चूक होतो त्यामुळे अशापद्धतीने एखाद्याला दंड केला जातो. आम्ही यासंदर्भात तसाप करत असून त्या व्यक्तीचे म्हणणे खरे ठरल्यास आम्ही त्याला दंडाची रक्कम परत करु,’ अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अजीजुल हक यांनी ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’शी बोलताना दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 1:29 pm