आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. “गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल” असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत ही माहिती दिली आहे.

आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. मात्र या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलं आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. ताजमहाल या वास्तूच्या पूर्वेकडे असलेल्या द्वाराजवळ हे संग्रहालय बांधण्यात येतं आहे.

आग्रा येथील ताजमहाल या वास्तूजवळ मुघल संग्रहालयाचं बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हाच या संग्रहालयाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेल्याची महत्त्वाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

“उत्तर प्रदेश सरकार स्वराज्याच्या विचारांनी प्रेरित आहे. गुलामीच्या मानसिकतेचं प्रतीक चिन्हं सोडून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपले नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत.” असंही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.