विवाहाचा प्रस्ताव फेटाळल्याने एकोणीस वर्षांच्या तरुणीने तिच्या २१ वर्षीय मित्राच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. रविवारी रात्री उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे ही घटना घडली.
ोंडावर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या प्राथमिक माहिती अहवालानुसार आफ्रिन या मुलीने सूरजकुमार याला वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले. तेथुन परतताना या मुलीने सूरजकुमारवर अॅसिड फेकले. कुमार हा २० टक्के भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत व त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, त्याचा चेहरा काहीसा विद्रूपही झाला आहे. सूरजकुमारने सांगितले, की मी हिंदूू व ती मुस्लीम असल्याने विवाह होऊ शकत नव्हता, माझा विवाह ठरला आहे असे मी तिला सांगितले होते, त्यामुळे तिला राग आलेला होता.
परिक्षेत्र अधिकारी रामानंद कुशवाह यांनी सांगितले, की प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला. पोलिसांनी मुलीवर ३२६ ए कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 12:48 am