24 September 2020

News Flash

Video : साध्वीने दिली स्वतःच्याच शिष्याच्या हत्येची सुपारी !

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जैन साध्वी एकाच्या हत्येचा कट रचताना दिसत आहे. जमिनीशी निगडीत वादातून हा कट रचण्यात आल्याचं सांगितलं जातंय. ही साध्वी आपल्याच एका शिष्याच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.

काय आहे व्हिडीओत –
व्हिडीओमध्ये एक साध्वी पांढऱ्या साडीमध्ये दिसत असून एका माणसाचा आवाज येतो की मर्डर कधी करायचाय. त्यानंतर 26 तारखेला खून करण्याचं ठरतं. हत्येनंतर तर जमीन त्याच्याच कुटुंबियांच्या नावावर होईल असं म्हणताना पुन्हा त्याच व्यक्तीचा आवाज येतो. त्यावर, असं काही होणार नाही…ट्रस्टचा पैसा लागला आहे…जमीन ट्रस्टच्या नावावर होईल असं साध्वी म्हणते. हत्येच्या सुपारीची रक्कमही ट्रस्टच्या नावे दिली जाईल असंही या व्हिडीओत ऐकायला येतंय.

माध्यमांतील वृत्तानुसार, कट रचण्याच्या काही वेळापूर्वीच साध्वीने पारस नावाच्या एका शिष्याची आश्रमातून हकालपट्टी केली. मंदिराच्या ट्रस्टची काही जमीन पारसच्या नावावर होती. हकालपट्टी झाल्यानंतर जमीन परत करण्यास तो नकार देत होता, त्यानंतर साध्वीने त्याच्या हत्येचा कट रचला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जैन संतांमध्ये खळबळ उडाली. संमती धर्मयोगी समितीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. समितीचे अध्यक्ष श्रेयांश जैन यांनी, पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन सत्य बाहेर आणावं अशी मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ – (सौजन्य – अमर उजाला)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 4:16 pm

Web Title: up jain sadhvi planning murder of her disciple goes viral
Next Stories
1 अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तान आता गाढवांची मदत घेणार
2 ‘कधीही लाच घेऊ नकोस’,….जेव्हा मोदींच्या आईने मागितलं होतं आश्वासन
3 कनिष्ठ जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध, वडिलांनी गळा दाबून केली मुलीची हत्या
Just Now!
X