24 January 2021

News Flash

Honour Killing: बहिणीचा, प्रियकराची नी साक्षीदार असलेल्या भावाची केली हत्या

प्रेयसीच्या भावासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे

कायद्यात कठोर शिक्षा असतानाही देशातील ऑनर किलिंगच्या घटना थांबायच्या नाव घेत नाहीत. दररोज कुठे ना कुठे ऑनर कलिंगची घटना समोर येतेच. उत्तर प्रदेशमधील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर, प्रेयसीसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या मृतदेहासोबतही छेडछाड करण्यात आली आहे. धनारी पोलिस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या गढा गावांत ही घटना घडली आहे. या प्रकरणात प्रेयसीच्या भावासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर बंटी आणि प्रेयसी सुखिया यांची हत्या करण्यात आली आहे. त्यासाठी गावातीलच दोन तरुणांना आडीच लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यानंतर या हत्येचा उलगडा होईल या भीतीने मुलीच्या भाऊ कुलदीप उर्फ सुखा याचीही हत्या करण्यात आली. या प्रकरणी सुखियाच्या दोन्ही भावांना आणि पैसे घेऊन हत्या करणाऱ्या दोघांने असं एकूण चार जणांना अटक केली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना एसपी यमुना प्रसाद म्हणाले की, २५ जून रोजी रात्री या प्रेमीयुगलांची हत्या करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता ते म्हणाले की, रात्री प्रियकर आणि प्रियसी घरातून पळाले. गावाबाहेरील ऊसाच्या शेतात दोघेही लपून बसले होते. गावातील एका व्यक्तीने त्यांना पाहिलं होते. प्रेयसीच्या भावाला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर बदनामीच्या भितीनं विनीत आणि किशोरी यांनी गावातील दोघांना आडीच लाखांची सुपारी दिली. त्यानंतर चौघांनी मिळून ऊसाच्यी शेतात त्या दोघांची हत्या केली.

एसपी म्हणाले की, या हत्याकांडावेळी लहान भाऊ कुलदीपही घटनास्थळावर उपस्थित होता. त्यावेळी कुलदीपला समजावून त्या चौघांनी त्याला घऱी पाठवलं. त्यानंतर त्या बंटी आणि सुखिया यांचे मृतदेह झाडावर लटकावले. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तोंडावर अॅसीड टाकलं. त्यानंतर दोघांची केसेही कापली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री कुलदीपला ऊसाच्या शेतात बोलवलं आणि हत्या केली. आत्महत्या वाटावा म्हणून हत्या केल्यानंतर मृतदेह झाडाला लटकावला. पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्यासाठी दिलेले आडीच लाख, अॅसीड बॉटलसर अन्य सामानही पोलिसांनी जप्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:01 pm

Web Title: up man kills sister her lover to save family honour then kills brother who witnessed crime nck 90
Next Stories
1 “उत्तर प्रदेश पोलिसांनी जे केलं ते…”, विकास दुबेला ठार केल्यानंतर शहीद पोलिसाच्या वडिलांची प्रतिक्रिया
2 “मी समाधानी, मात्र दुबेची चौकशी झाली असती तर…”; शहीद पोलिसाच्या पत्नीची प्रतिक्रिया
3 गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?, प्रियंका गांधींचा सवाल
Just Now!
X