31 October 2020

News Flash

बाटलीत पेट्रोल दिलं नाही म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला

कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेशमधील मुरादाबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॅस्टिक बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका गिऱ्हाईकाने केल्याची घटना येथे घडली आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पेट्रोल पंपावर प्लॅस्टिक बाटलीमध्ये पेट्रोल घेण्याच्या उद्देशाने आला होता. मात्र नियमांनुसार बाटलीमध्ये पेट्रोल देऊ शकत नाही असं पंपावरील कर्मचाऱ्याने सांगितले. तरीही आरोपी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्येच पेट्रोल हवे असल्याचं सांगत होता. दोघांमध्ये यावरुन बाचाबाची झाली. रागाच्या भरात आरोपीने पेट्रोल टाकून पंपावरील कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नियम

पेट्रोलियम रुल्स १९७६ म्हणजेच पेट्रोलसंबंधीत नियमांनुसार, सुट्टे पेट्रोल देताना ते केवळ टीनच्या किंवा लोखंडाच्या बाटली अथवा डब्यामध्ये देण्यात येते. तसेच अशा पद्धतीने किती पेट्रोल द्यावे याला एक मर्यादा असते. तेलंगणामध्ये तर या कायद्यामध्ये आणखीन सुधारणा करुन बीलाशिवाय पेट्रोल विक्रीस बंदी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 5:04 pm

Web Title: up man tries to burn down a petrol pump employee after being denied petrol scsg 91
Next Stories
1 #CAA : तुमचे अधिकार हिसकावणाऱ्यांना माझ्या मृतदेहावरून जावे लागेल : ममता बॅनर्जी
2 निर्भया बलात्कार प्रकरण: २२ जानेवारी रोजी दोषींना फाशी
3 Bharat Bandh: बँका बंद राहणार, ATM सेवेलाही बसणार फटका
Just Now!
X