करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. लॉकडाउन ३० जून पर्यंत वाढवण्यातही आला आहे. मात्र या लॉकडाउनचा फटका सर्वात जास्त बसला तो स्थलांतरित मजुरांना. उत्तर प्रदेशात एका स्थलांतरित मजुराच्या कुटुंबावर अन्न आणि औषधांसाठी दागिने विकण्याची वेळ आली आहे. यासंदर्भातलं वृत्त प्रसारित होताच प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

उत्तर प्रदेशातल्या एका मजुराला तामिळनाडूतून त्याच्या घरी म्हणजेच उत्तर प्रदेशात परत पाठवण्यात आलं. या मजुराला त्याच्या कुटुंबासह परतावं लागलं. मागच्या महिन्यात या मजुराच्या घरमालकानेही त्याला घर सोडण्यास सांगितले. त्यामुळे या मजुराच्या कुटुंबावर दागिने विकण्याची वेळ आली. मजुराला त्याच्या पत्नीचे दागिने विकून १५०० रुपये मिळाले. यातून या मजुराने आणि त्याच्या कुटुंबीयांनी अन्न आणि औषधं खरेदी केली. या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या मजुराला मदत केली. एनडीटीव्हीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

या मजुराकडे रेशन कार्ड आहे. हा मजूर कुल्फी विकत होता. लॉकडाउनच्या काळात या मजुराला घरी पाठवण्यात आलं. त्याच्या कुटुंबालाही पाठवण्यात आलं. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या मजुराने त्याच्या बायकोचे दागिने विकले आणि १५०० रुपयांमधून औषधं आणि अन्न खरेदी केलं. ही माहिती जेव्हा जिल्हा प्रशासनाला समजली तेव्हा त्यांनी या मजुराला मदत केली. आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून १० किलो तांदूळ आणि इतर काही धान्य मिळालं असं या मजुराने सांगितलं. माझी आई आणि दोन मुली आजारी झाल्या. त्यांच्या औषधासाठी माझ्याकडे पैसे नव्हते त्यामुळे मला पत्नीचे दागिने विकावे लागले असं या मजुराने सांगितलं.