नोयडा येथे दोन चुलत भावांनी १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नोयडा सेक्ट २० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निठारी गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलीने आपल्याबरोबर घडलेली आपभीती वडिलांना सांगतली.

वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष करत प्रकरण सोडून दिले. त्यानंतर पीडित मुलीने जिल्हा बाल कल्याण समितीला रितसर प्रकरण सांगितले. बाल कल्याण समितीच्या आधारावर नोयडा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही पीडित मुलीचे चुलत भाऊ आहेत. या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘निठारी गांवामध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन्ही चुलत भावांनी बलात्कार केला. किशन आणि सुनील अशी त्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी मुलीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने याची तक्रार वडिलांकडे केली होती पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशी माहिती पोलिस उपाध्यक्ष अनित कुमार यांनी दिली.