21 September 2020

News Flash

पोलीस स्थानकातला धक्कादायक प्रकार, तक्रारीसाठी आलेल्या महिलेसमोरच अधिकाऱ्याने…

त्रासाला कंटाळून अखेर महिलेने बनवला व्हिडीओ

पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला आलेल्या महिलेसमोरच एका पोलीस अधिकाऱ्याने अश्लील वर्तन केले. हा पोलीस अधिकारी महिलेसमोरच हस्तमैथुन करत होता. उत्तर प्रदेशच्या देवरीयामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून हा अधिकारी महिलेबरोबर अशाच प्रकारे गैरवर्तन करत होता. अखेर महिलेने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

भातनी पोलीस ठाण्याचा एसएचओ महिला तक्रारदारासमोरच हस्तमैथुन करत होता. “अश्लील वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे” असे देवरीयाच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितले. हा व्हिडीओ व्हायरल होताच, स्थानिकांनी पोलीस अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- धक्कादायक ! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिला पत्रकारासमोर केलं अश्लील कृत्य, गुन्हा दाखल

पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या कार्यालयात पहिल्यांदाच महिलेबरोबर गैरवर्तन केलेले नाही. यापूर्वी सुद्धा महिला जमीन वादासंबंधी पोलीस ठाण्यात जायची, त्यावेळी तो गैरवर्तन करायचा असे सूत्रांनी सांगितले. महिलेसोबत तिची मुलगी सुद्धा पोलीस ठाण्यात जायची. पोलीस अधिकाऱ्याच्या या अश्लील वर्तनाला त्रासलेल्या महिलेने अखेर छुप्या कॅमेऱ्याने त्याच्या अश्लील कृतीचा व्हिडीओ बनवला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. “पहिले दोन-तीन वेळा त्याच्या वर्तनाकडे मी दुर्लक्ष केले. जमीन वादात त्याने तक्रार नोंदवून घ्यावी, यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. पण अधिकाऱ्याच्या वर्तनात कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळे अखेर व्हिडीओ बनवला” असे तक्रारदार महिलेने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 2:28 pm

Web Title: up police officer masturbates in front of woman at police station dmp 82
Next Stories
1 VIDEO: तीन वर्षाच्या चिमुकल्याला जवानाने दहशतवाद्यांच्या गोळीबारातून वाचवलं आणि…
2 …हीच विठ्ठल चरणी प्रार्थना; नरेंद्र मोदींनी मराठीतून दिल्या आषाढीच्या शुभेच्छा
3 चिनी अ‍ॅपची वकिली करणार नाही, TikTok ची केस घेण्यास मुकुल रोहतगी यांचा नकार
Just Now!
X