21 November 2019

News Flash

धक्कादायक! नवऱ्याला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल

दुचाकीवरुन जाणाऱ्या एका जोडप्याचा मार्ग काही आरोपींनी रोखून धरला. आरोपींनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली.

उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महिला सुरक्षेबद्दल योगी सरकारकडून अनेक दावे केले जातात पण राज्यात महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. आता रामपूरमध्ये एका विवाहित महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे.

दुचाकीवरुन जाणाऱ्या एका जोडप्याचा मार्ग काही आरोपींनी रोखून धरला. आरोपींनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. नवऱ्याने त्यांना विरोध केल्यानंतर आरोपींनी दोघांना मारहाण केली. आरोपी एवढयावरच थांबले नाहीत. त्यांनी नवऱ्याला झाडाला बांधले व त्याच्यासमोर पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर आरोपींनी या प्रकाराचा व्हिडिओ बनवला व सोशल मीडियावर व्हायरल केला. जोडप्याने आरोपींविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. प्रसारमाध्यमांनी जेव्हा हे प्रकरण उचलून धरले तेव्हा पोलिसांनी हालचाल सुरु केली. तीन आरोपींची ओळख पटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

First Published on June 18, 2019 5:26 pm

Web Title: up rampur tie husband to tree gangrape wife video viral dmp 82
Just Now!
X