उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. “जर कोणी फक्त कमी कपडे घालून महान बनत असतं तर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठी झाली असती”, असं वक्तव्य हृदय दीक्षित रविवारी (१९ सप्टेंबर) केलं आहे.मात्र, उन्नाव जिल्ह्यातील बांगरमाऊ विधानसभा मतदारसंघात ‘प्रबुद्ध वर्ग संमेलना’दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, दीक्षित यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. त्यानंतर, आता दीक्षित यांनी ट्विट करत यासंदर्भात आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

हृदय दीक्षित यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, “सोशल मीडियावर काही जण माझ्या एका भाषणाचा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. मात्र, हा व्हिडीओ जो संदर्भहीन आहे. खरंतर हा व्हिडीओ उन्नावच्या प्रबुद्ध परिषदेतील माझ्या भाषणाचा फक्त एक भाग आहे. ज्यात परिषदेच्या संचालकाने माझी ओळख करून देताना मला ‘एक प्रबुद्ध लेखक’ म्हणून संबोधलं आहे.” यापुढे आपल्या भाषणात राखी सावंत आणि महात्मा गांधी यांच्याबद्दलचं विधान का केलं? याचं कारणही दीक्षित यांनी सांगितलं आहे.

“नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत!”

“मी यावेळी असं म्हणालो होतो की काही पुस्तकं आणि लेख लिहून कोणीही ज्ञानी होत नाही. महात्मा गांधी कमी कपडे घालायचे. देशाने त्यांना ‘बापू’ म्हटलं. पण याचा अर्थ असा नाही की राखी सावंतही गांधीजी होतील. मित्रांनो, कृपया माझं हे भाषण केवळ वास्तविक संदर्भात स्वीकारा”, असं म्हणत हृदय दीक्षित यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, या वादग्रस्त विधानानंतर दीक्षित यांच्यावर मोठी टीका करण्यात आली आहे.

“तर मी तुमचा ‘चड्ढा ‘ उतरवेन…”, AAP नेते राघव चड्ढांवर भडकली राखी सावंत

आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार राघव चड्ढा यांनी देखील काही दिवसांपूर्वी असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत आहेत, अशी टीका त्यांनी केली होती.