उत्तर प्रदेशात महामार्ग एनएच २ व एनएच २५ या दोन महामार्गावर गस्ती पथक तैनात केले जात असून, ते महामार्गावर गस्त घालणारे देशातील पहिले पथक असणार आहे.
या पथकांना न्यूझीलंड प्रशिक्षण देत आहे. त्यांचा पोशाख फॅशन डिझायनर्सनी तयार केला आहे. हरयाणा प्रदेश हायवे पॅट्रॉल असे या दलाचे नाव असून त्याचा खर्च २५० कोटी रुपये आहे.
या युनिटचे ब्रँडिग केले जाणार असून दर ४० कि.मी.ला कमांड सेंटर असणार आहेत. २०० मोटारी व साडेतीनशे सीसीच्या १५० बाईक यात असतील. ५०० ते ६०० जवान त्यात असतील व ७५० कि.मी.च्या मार्गावर ही गस्त सुरू होणार आहे. त्यात जीपीएस व टॅब्लेट्सचाही वापर केला जाणार आहे.