पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी लवकरच नवाझ शरीफ विराजमान होणार आहेत. त्यामुळे भविष्यात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारणे हे या दोन्ही देशांच्या नेत्यांवर अवलंबून असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याची गरज आहे. मात्र ते पूर्णत: दोन्ही देशांचे नेते एकमेकांशी कशा प्रकारे सहकार्याची भूमिका घेतात, यावर सारे काही अवलंबून असल्याचे मत प्रवक्ते जेन पसाकी यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानात नवीन सरकार स्थापन होत आहे. या पाश्र्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान तसेच अमेरिकेसोबतचे पाकिस्तानचे संबंध याबाबत विचारण्यात आला. त्यावर बोलताना पसाकी म्हणाले की, नवाझ शरीफ यांनी
देखील अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक सुदृढ करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानात पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर प्रमुख अशफाक परवेझ कयानी यांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही अमेरिकेने कौतुक केले आहे. भारतासह संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करेल असा आशावादही अमेरीकेने व्यक्त केला.