News Flash

दिव्यांग पतीला पाठीवर उचलून CMO कार्यालयात पोहोचली महिला, कारण…

सरकारी कामं कशाप्रकारे होतात याचं उदाहरण

उत्तर प्रदेशमध्ये सरकारी कामं कशाप्रकारे होतात याचं उदाहरण मंगळवारी ( दि.3) मथुरा येथे पाहायला मिळालं. येथे एका महिलेला कोणताच पर्याय नसल्याने स्वतःच्या दिव्यांग पतीला पाठीवर उचलून मुख्य वैद्यकीय अधिका-यांच्या कार्यालयात(CMO) न्यावं लागलं. पतीसाठी व्हिलचेअर न मिळाल्याने तिला पतीला पाठीवर उचलून नेण्याशिवाय पर्याय नव्हता. पतीच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनवण्यासाठी ही महिला अनेक दिवसांपासून सीएमओ कार्यालयाच्या फे-या मारत आहे. ‘भारत बंद’दरम्यान बिजनौरमध्येही अशीच घटना समोर आली होती. एक व्यक्ती आपल्या वृद्ध पित्याला खांद्यावर घेऊन रूग्णालयात पोहोचला होता.

रस्ता अपघातात महिलेच्या पतीचा पाय तुटला होता. तीन वर्षांपूर्वी हा अपघात झाला होता, तेव्हापासून ही महिला पतीचं प्रमाणपत्र बनवण्यासाठी सीएमओ कार्यालयाच्या फे-या मारत आहे, पण अद्यापही तिला प्रमाणपत्र मिळालेलं नाही. अनेक सामाजिक संघटनांकडेही मदत मागितली पण कोणीही मदत केली नाही असंही ती महिला म्हणाली.

याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री भूपेंद्र चौधरी यांनी अशाप्रकारचं चित्रं सभ्य समाजासाठी दुःखद असल्याचं म्हटलं आहे. शक्य त्याप्रकारे महिलेची मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 10:36 am

Web Title: up women carries handicapped husband on shoulders to get disability certificate made
Next Stories
1 भंडाऱ्याची वाघीण! बिबट्याशी दिली झुंज
2 लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा नाही देणार केंद्र सरकार !
3 गंभीरच्या उत्तराला आफ्रिदीचं प्रत्युत्तर, काश्मीरवरुन गंभीर-आफ्रिदीत जुंपली
Just Now!
X