21 September 2020

News Flash

चर्च हल्ल्यांवरून संसदेत गदारोळ

देशात चर्च आणि अन्य धार्मिक स्थळांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांवरून बुधवारी संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत जोरदार वाद झाला.

| April 23, 2015 02:22 am

देशात चर्च आणि अन्य धार्मिक स्थळांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांवरून बुधवारी संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत जोरदार वाद झाला.
काँग्रेसचे नेते के. सी. वेणूगोपाल यांनी लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी देशात चर्च आणि अन्य धार्मिक स्थळांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांबद्दल काळजी व्यक्त केली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा मुद्दा जाणूनबुजून उपस्थित केला जात असल्याचा आरोप केला.
त्यावर काँग्रेस, आययूएमएल तसेच डाव्या पक्षांच्या खासदारांनी गंभीर आक्षेप घेत गदारोळ केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्दय़ावर संसदेत विस्तृत निवेदन सादर करण्याची तयारी दाखवली. तसेच कोणाच्या सत्ताकाळात धार्मिक स्थळांवर किती हल्ले झाले, याची पूर्ण आकडेवारीही जाहीर करू असे सांगितले. गृगमंत्र्यांच्या या उत्तराने विरोधी बाकावरील सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे गदारोळच सुरूच राहिल्याने काही मिनिटे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 2:22 am

Web Title: uproar in parliament over church attack
Next Stories
1 बिहारमधील वादळात ३२ ठार
2 खरगपूर आयआयटी तंत्रज्ञांकडून शेती दत्तक
3 जे.बी. पटनाईक यांना अखेरचा निरोप
Just Now!
X