06 July 2020

News Flash

UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर; पुढच्या वर्षी होणार मुख्य परीक्षा

करोनामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती

संग्रहित छायाचित्र

करोना प्रसाराच्या धोक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेची तारीख करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्वच काम ठप्प झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांवरही यांचा परिणाम झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगानं जाहीर केलं होतं. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगानं अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेलं वेळापत्रक

करोनाचा परिणाम इतर परीक्षांवरही झाला आहे. ऐन परीक्षांच्या काळातच करोनाचा भारतात शिरकाव झाला. त्यामुळे अंतिम परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारनं लॉकडाउन शिथिल करत सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्याच काम सुरू केलं आहे. परिस्थिती सुधारत असल्याचं दिसून आल्यानंतर आयोगानं नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 3:22 pm

Web Title: upsc civil services prelims exam 2020 new dates announced bmh 90
Next Stories
1 नव्या सरकारी योजनांबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
2 दिल्लीचं टेन्शन वाढलं; चाचणी झालेल्या चार व्यक्तींमागे एकाचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह
3 करोनातून बरं झाल्याने स्वतःला भाग्यवान समजतोय-प्रिन्स चार्ल्स
Just Now!
X