News Flash

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”; केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

३० सप्टेंबरला पुन्हा सुनावणी

संग्रहित छायाचित्र.

यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती. आता परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं असून, ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं न्यायालयाला सांगितलं. परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता बुधवारी अर्थात ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका दाखल केलेली आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांचे वकील अलख अलोक श्रीवास्तव यांना याचिकेची प्रत केंद्रीय लोकसेवा आयोग व केंद्र सरकार देण्यास सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 11:48 am

Web Title: upsc supreme court civil services prelims exam defer bmh 90
Next Stories
1 Video : शेतकऱ्यांनी कृषी विधेयकांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देताना भाजपा खासदाराने काढला पळ
2 पोलीस उपनिरीक्षकाने प्रेयसीवर गोळी झाडून रस्त्यात फेकलं
3 एन्काउंटरच्या भीतीने ‘मला गोळी मारु नका’ अशी पाटी घालून पोलिसांना शरण आला कुख्यात गुंड
Just Now!
X