News Flash

‘आरबीआय’च्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती

उर्जित पटेल सध्या आरबीआच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कार्यरत आहेत

उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाल ४ सप्टेंबर २०१६ रोजी संपत आहे. रघुराम राजन यांच्यानंतर उर्जित पटेल आरबीयाच्या गव्हर्गनर पदाचा कार्यभार सांभाळतील. उर्जित पटेल सध्या आरबीआच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत. भारतीय रिझव्‍‌र्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुदतवाढ स्विकारण्यास नकार दिल्यानंतर नव्या गव्हर्नरपदासाठी अनेक नावे चर्चेत होती.

त्यामध्ये अर्थतज्ज्ञ आणि आरबीआचे डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यासह कॅगचे माजी प्रमुख विनोद राय आणि एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची नावे आघाडीवर होती. तर मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, जागतिक बॅंकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बसू, महसूल सचिव शक्तिकांत दास, के. व्ही. कामत,  सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा, डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन, सुबीर गोकर्ण, अशोक लाहिरी, माजी अर्थसचिव विजय केळकर, सीसीआयचे माजी अध्यक्ष अशोक चावला, अशोक लाहिरी आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आर. वैद्यनाथन यांचीही नावे चर्चेत होती. अखेर पटेल यांच्या नावावर मोदी सरकारने आज शिक्कामोर्तब केले.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करायची याबाबत सविस्तर चर्चा केली होती. या बैठकीतच उर्जित पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

रघुराम राजन यांनी मुदत वाढ स्विकारण्यास नकार दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी सरकार कोणाची  नियुक्ती करणार याबाबत उत्सुकता होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2016 6:41 pm

Web Title: urjit patel appointed new rbi governor reserve bank of india
Next Stories
1 ‘नेहरूंच्या आर्थिक धोरणांमुळे देशाचा विकास रखडला’
2 शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याच्या पोटातील ४० चाकू बाहेर काढले!
3 मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी नको: मजदक बलुच
Just Now!
X