01 March 2021

News Flash

शक्तीशाली अमेरिकन एअर फोर्सचं फायटर विमान समुद्रात कोसळलं

ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या बेसवरुन केलेलं उड्डाण

अमेरिकन एअर फोर्सच्या एफ-१५ सी फायटर विमानाला सोमवारी अपघात झाला. पूर्व इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या बेसवरुन एफ-१५ सी विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान उत्तर समुद्रात कोसळले. अमेरिकन हवाई दलाची जगातील शक्तीशाली एअर फोर्समध्ये गणना होते. त्यांच्याकडे एकाहून एक सरस फायटर विमानं आहेत.

“सकाळी ९.४० च्या सुमारास एफ-१५ सी इगल विमान उत्तर समुद्रात कोसळले” अशी माहिती यूएस एअर फोर्सचे कॅप्टन मिरांडा टी सिमॉन्स यांनी दिली. अपघाताचे कारण आणि वैमानिकाबद्दल अजून काहीही माहिती मिळू शकलेली नाही. एएफपीने हे वृत्त दिले आहे.

ब्रिटिश एअर फोर्सकडून अपघातग्रस्त विमानाचा शोध सुरु झाला आहे.सफोकमधील मिल्डनहॉल जवळच्या लेकनहीथ एअरबेसवरुन एफ-१५ फाटयर विमानाने उड्डाण केले होते. पूर्व यॉर्क शायरच्या किनारपट्टीपासून १३७ किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले असे बीबीसीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 5:45 pm

Web Title: us air force fighter plane crashes into north sea dmp 82
Next Stories
1 देशातील ‘या’ प्रमुख शहरात येत्या १९ जूनपासून पुन्हा पूर्णपणे लॉकडाउन
2 जगातील कुठल्याही शक्तीमुळे भारत-नेपाळ संबंध तुटणार नाहीत – राजनाथ सिंह
3 ‘सॉरी हा… चुकुन तुमच्या जमिनीचा ताबा घेतला’; ‘या’ देशानं शेजारी देशाला दिलं अजब उत्तर
Just Now!
X