28 September 2020

News Flash

मदतीच्या आशेवर असलेल्या पाकिस्तानला अमेरिका देणार ८४ लाख डॉलर

पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत पॉल जोन्स यांनी शुक्रवारी या मदतीची घोषणा केली.

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी आर्थिक दृष्टया सक्षम नसलेल्या पाकिस्तानला अमेरिकेने ८४ लाख अमेरिकन डॉलरची मदत जाहीर केली आहे. पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत पॉल जोन्स यांनी शुक्रवारी या मदतीची घोषणा केली.

करोनाचा व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी तसेच करोनाची बाधा झालेल्यांवर उपचारांसाठी पाकिस्तानला आर्थिक मदत देणार असल्याचे पॉल जोन्स यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. पाकिस्तानातील करोना व्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये तीन नवीन मोबाइल प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी ३० लाख अमेरिकन डॉलर्सचा वापर करण्यात येईल असे डॉन न्यूजने म्हटले आहे.

लोकांच्या घरोघरी जाऊन करोना चाचण्या करण्यासाठी आरोग्य सेवकांना प्रशिक्षित करण्यात येईल. त्यासाठी या निधीचा वापर करण्यात येईल. पाकिस्तानात ७४७६ जणांना करोनाची लागण झाली असून १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तिथे करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आणखी वाढू शकतो.

आणखी वाचा- Coronavirus: संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’, जगाला मदतीचा हात दिल्याबद्दल कौतुक

“आम्हालाही मदत करा”, पाकिस्तानने भारतासमोर पसरले हात
करोनाचा फैलाव संपूर्ण जगभरात झाला असून पाकिस्तानमध्येही थैमान घातला आहे. करोनासोबत लढण्यासाठी इम्रान खान सरकारने आता भारताकडे मदत मागितली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे.

याआधी इम्रान खान यांनी पाकिस्तानला मदतीचं आवाहन करणार एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की, “आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना माझं आवाहन आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 1:20 pm

Web Title: us announces 8 4 million aid to pakistan against coronavirus dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 अचानक चीनमधील मृतांचा आकडा ५० टक्क्यांनी वाढला
2 लॅबमधल्या इंटर्नकडून अपघाताने Covid-19 व्हायरस लीक झाला, अमेरिकन मीडिया
3 मोबाईल विकून धान्य आणलं अन् घरातच गळफास लावून केली आत्महत्या
Just Now!
X