11 August 2020

News Flash

अमेरिकेतील व्हिसा घोटाळ्यात २१ अटकेत

अमेरिकी अधिकाऱ्यांनी दहा भारतीय अमेरिकी व्यक्तींसह २१ जणांना व्हिसा घोटाळ्यात अटक केली आहे.

| April 7, 2016 02:01 am

अमेरिकी अधिकाऱ्यांनी दहा भारतीय अमेरिकी व्यक्तींसह २१ जणांना व्हिसा घोटाळ्यात अटक केली आहे.

आरोपींपैकी दहाजणभारतीय वंशाचे
बनावट विद्यापीठाच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन करून अमेरिकी अधिकाऱ्यांनी दहा भारतीय अमेरिकी व्यक्तींसह २१ जणांना व्हिसा घोटाळ्यात अटक केली आहे. अमेरिकेत व्हिसा घोटाळे नेहमी होत असतात, त्यामुळे अधिकाऱ्यांनीच एक खोटे विद्यापीठ स्थापन केल्याचे दाखवून त्यातील गैरप्रकार उघड केले आहेत. एकूण हजार परदेशी व्यक्तींकडे विद्यार्थी किंवा नोकरी व्हिसा आहे, असे या घोटाळ्यात उघड झाले. संघराज्य अधिकाऱ्यांनी याबाबत न्यूयॉर्क, न्यूजर्सी, वॉशिंग्टन व व्हर्जिनियात किमान २१ जणांना अटक केली आहे. संबंधित व्यक्तींनी बनावट विद्यापीठात प्रवेश घेऊन व्हिसा मिळवल्याचे स्पष्ट झाले. ते खोटे विद्यापीठ अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षा विभागाच्या हस्तकांनी सुरू केलेले होते व संपूर्ण स्टिंग ऑपरेशन राबवण्यात आले, असे न्यूजर्सीचे अमेरिकी वकील पॉल जे फिशमन यांनी सांगितले.
अटक केलेले लोक हे मध्यस्थ, नोकरी मिळवून देणारे व नियोक्ते यांच्यापैकी आहेत, त्यांनी बेकायदेशीरपणे २६ देशांतील १ हजार लोकांना विद्यार्थी व्हिसा व नोकरी व्हिसा मिळवण्यासाठी मदत केली. यातील ज्यांना व्हिसा व अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळाली त्यांनी बरेच पैसे मध्यस्थांना दिले होते व ते विद्यार्थी भारतातील होते. अधिकाऱ्यांनी किती भारतीय विद्यार्थ्यांना अटक केली, हे सांगण्यास नकार दिला. हे स्टिंग ऑपरेशन वर्षभर चालू होते व त्यात स्थलांतर विभाग व कायदा अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला होता. अमेरिकी सरकारने अटक केलेल्या लोकांचे नागरिकत्व जाहीर केले नसले, तरी नावावरून त्यातील १० जण भारतीय किंवा भारतीय अमेरिकी आहेत. त्यात ताजेश कोडाळी, ज्योती पटले, शहजादी एम परवीन, नरेंद्र सिंग प्लाहा, संजीव सुखीजा, हरप्रीत सचदेव, अविनाश शंकर, कार्तिक निम्मला, युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न न्यूजर्सी या संस्थेचे विद्यार्थी म्हणून काही जणांना व्हिसा मिळवून दिल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली. न्यूजर्सीतील क्रॅनफोर्ड येथे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्दर्न न्यूजर्सी ही बनावट संस्था सप्टेंबर २०१३ मध्ये अंतर्गत सुरक्षा विभागाने स्थापन केली होती. वास्तव्यासाठी पैसे उकळण्यासाठी हे गैरप्रकार करण्यात आले असून खरोखर विद्यार्थी किंवा नोकरीसाठी म्हणून येणाऱ्यांची त्यामुळे बदनामी झाली आहे. अशा बेकायदेशीर प्रकारांनी अमेरिकेची सुरक्षा धोक्यात येते, असे फिशमन यांनी सांगितले. अंतर्गत सुरक्षा विभागाने स्टिंग ऑपरेशन केल्याने त्यातून अनेक अनधिकृत बाबी सामोऱ्या आल्या आहेत. अनेक शिक्षण संस्था या व्हिसा मिळवण्याच्या गिरण्या झाल्या आहेत, या संस्थांना अभ्यासक्रम नसतो, वर्ग होत नसतात, विद्यार्थी व शिक्षक नसतात तरी व्हिसा मिळवून देण्यासाठी या संस्था चालवल्या जातात. या महाविद्यालये व संस्थांच्या भ्रष्ट प्रशासकांनी आय २० फॉर्म भरून दिलेला असतो व त्यासाठी काही पैसे भरलेले असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 2:01 am

Web Title: us authorities arrest 21 in fake university student visa scam
Next Stories
1 श्रीनगर एनआयटीत तणाव कायम
2 पनामा पेपर्सप्रकरणी ‘मोझॅक फोन्सेका’कडून फौजदारी गुन्हा
3 हवामान बदलांच्या अभ्यासासाठी नासा व इस्रो उपग्रह सोडणार
Just Now!
X