News Flash

अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू

हा एक कथित हल्ला मानला जात आहे

(AP Photo/J. Scott Applewhite)

अमेरिकेतील कॅपिटॉलमध्ये वाहनाने धडक दिल्याने एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. हा एक कथित हल्ला मानला जात आहे. वॉशिंग्टन कॉम्प्लेक्स येथे वाहनाने सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिअरला धडक दिली आणि आतमध्ये घुसले. यावेळी दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. यामधील एकाचा मृत्यू झाला. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

चालकाने वाहनातून बाहेर येत पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचं पोलीस प्रमुखांनी सांगितलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान या २५ वर्षीय हल्लेखोराची ओळख पटली असून हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. “हा हल्ला दहशतवादाशी संबंधित असल्याचं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही, मात्र आम्ही नक्कीच तपास करणार आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हल्लेखोराने मार्च महिन्यात ऑनलाइन केलेल्या काही पोस्टमधून निराशा आणि विकृती जाणवत आहे. आपण बेरोजगार असून आरोग्याच्या समस्या असल्याचाही उल्लेख त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. याशिवाय सरकार वर्णद्वेषी असल्याचं सांगत सरकार पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचं म्हटलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 8:32 am

Web Title: us capitol on lockdown after vehicle rams two police officials sgy 87
Next Stories
1 द्रमुक-काँग्रेसकडून महिलांचा सातत्याने अपमान – मोदी
2 अमेरिकी कॅपिटॉलमध्ये मोटार घुसवण्याचा प्रयत्न
3 करोना शिखरावस्था एप्रिलच्या मध्यात
Just Now!
X