युद्धा नौका आणि लढाऊ विमानांवर हल्लाबोल करण्याची क्षमता असणाऱ्या एमके -45 या प्रकारच्या अत्याधुनिक तोफा येत्या काही महिन्यांमध्ये भारताच्या ताफ्यात असतील. अशा प्रकारच्या 13 तोफा भारताला विक्री करण्याच्या व्यवहाराला अमेरिकेने मंजुरी दिली आहे.
या 13 तोफांसाठी भारताला 7100 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. संरक्षण सौद्यांना मंजुरी देणाऱ्या अमेरिकेच्या संस्थेने बुधवारी रात्री याबाबत माहिती दिली.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याने नौदलाच्या ऑपरेशन्ससाठी या तोफांची निर्मिती केली आहे. त्याचे आधुनिक व्हर्जन भारताला मिळणार आहे. भारताला मिळणाऱ्या तोफांचा पुढचा भाग (बॅरेल) हा अपेक्षित लांबीपेक्षा अधिक असेल. या तोफांसोबत भारताला त्यासाठी लागणारा दारूगोळा, इतर उपकरणेही विकली जाणार आहेत.

भारताच्या नौदलाची वाढणार क्षमता
अमेरिका भारतीय सैनिकांना ही एमके 45 तोफ कशी चालवायची, याचेही प्रशिक्षण देणार आहे. या तोफा भारताला मिळाल्यानंतर नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या तोफा भारताच्या ताब्यात आल्यानंतर त्या ज्या युद्धनौकांवर लावल्या जातील त्यांना घेऊन अमेरिकेचे नौदल आणि इतर देशांचे नौदल विविध प्रकारचे सुरक्षा अभियान राबवू शकणार आहेत.

आणखी काय फायदा होणार?
पाकिस्तान समुद्रीमार्गे भारतावर हल्ला करेल, असा इशारा गुप्तचर खाते सातत्याने देत असतो. पाकचा हा नापाक इरादा उधळून लावण्यासाठी भारताला या तोफांचा फायदा होणार आहे. .