07 March 2021

News Flash

अमेरिकन काँग्रेसकडून बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब, ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार

निवडणुकीचा निकाल मान्य नसल्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला.

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकन काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी आज वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये हिंसाचार केला. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीमध्ये अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले. पण अखेर अमेरिकन काँग्रेसने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

आणखी वाचा- अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; जो बायडन म्हणाले…’हा विरोध नव्हे देशद्रोह’

जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवडयांच्या आता सत्तेचे हस्तांतरण होईल असे ट्रम्प यांनी सांगितले. सत्ता हस्तांतरणासाठी ट्रम्प तयार झाले असले तरी निवडणुकीचा निकाल मान्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

आणखी वाचा- हिंसाचारामुळे एकाचवेळी व्हाइट हाऊसमधील तीन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी दिले राजीनामे

अमेरिकेत आज लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारी घटना घडली. भावी राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच मोठया संख्येने ट्रम्प समर्थक राजधानी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीवर धडकले. कॅपिटॉल इमारतीमध्ये अमेरिकन काँग्रेसचे सभागृह आहे. इथे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्टोरल मतांची मोजणी सुरु होती. कॅपिटॉल इमारतीत झालेला हा हिंसाचार ट्रम्प यांच्या अनेक सहकाऱ्यांना पटलेला नाही. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 3:35 pm

Web Title: us congress confirms biden win after capitol siege dmp 82
Next Stories
1 भारताचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक; एक कोटीपेक्षा अधिक रूग्ण करोनामुक्त
2 हिंसाचारामुळे एकाचवेळी व्हाइट हाऊसमधील तीन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी दिले राजीनामे
3 अध्यक्ष पदाची मुदत संपण्याआधीच ट्रम्प यांची गच्छंती?; हिंसाचार प्रकरणात ऐतिहासिक निर्णयाची शक्यता
Just Now!
X