06 August 2020

News Flash

बेसबॉलच्या सरावादरम्यान अमेरिकी काँग्रेस सदस्यावर गोळीबार

स्टीव्ह स्कॅलिस यांच्यासह पाच जण जखमी झाले

गोळीबाराचे वृत्त समजताच सरावासाठी मैदानात जमलेल्या मंडळींनी जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे अमेरिकी काँग्रेस सदस्यांवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात काँग्रेसमन स्टीव्ह स्कॅलिस यांच्यासह पाच जण जखमी झाले आहेत.

वॉशिंग्टनजवळील उपनगरात अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांमध्ये बेसबॉलचा सामना होणार आहे. दरवर्षी अशा स्वरुपाचा सामन्याचे आयोजन केले जाते आणि या सामन्यासाठी व्हर्जिनियामध्ये सराव सुरु होता. सरावासाठी अमेरिकी काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्य स्टीव्ह स्कॅलिस आणि अन्य मंडळी उपस्थित होती. यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात स्कॅलिस जखमी झाले असून अमेरिकी काँग्रेसमधील एक कर्मचारी आणि दोन अधिकारीही या गोळीबारात जखमी झाले आहे. एकूण पाच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमेरिकी काँग्रेसमधील मॉ ब्रुक्स यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना या घटनेविषयी माहिती दिली. ‘स्कॅलिस यांना चालताही येत नव्हते. घटनास्थळावरुन बाहेर पडतानाही त्यांना त्रास होत होता’ असे ब्रुक्स यांनी सांगितले. स्कॅलिस यांना जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोराविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हल्लेखोर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हल्लेखोराने सुमारे १० ते २० राऊंड फायर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2017 7:19 pm

Web Title: us congressman steve scalise shot at baseball practice in virginia scalise and several others injured
Next Stories
1 ‘तुम्ही आमच्यासोबत की कतारसोबत?’ सौदीच्या राजांचा पाकिस्तानला थेट प्रश्न
2 दिल्लीत पोलीस ठाण्यापासून १०० मीटरवर उद्यानात मुलीवर सामूहिक बलात्कार
3 विजय मल्ल्या अडचणीत, ईडीकडून आरोपपत्र दाखल
Just Now!
X