कच्च्या तेलावरील ४० वर्षांपासूनची निर्यातबंदी अखेर अमेरिकेने उठवली. या निर्णयामुळे भविष्यात भारतासह इतर देशांना खनिज तेल आयात करणे शक्य होणार आहे.
अध्यक्ष बराक ओबामा निर्यात बंदी उठवण्याच्या कायद्यावर शनिवारी स्वाक्षरी केली. अमेरिकेच्या या निर्णयाचे उद्योग जगाने स्वागत केले आहे.
या निर्णयामुळे अमेरिकेची आर्थिक वाढ होणार असून रोजगार निर्मितीही होईल, तसेच ऊर्जा सुरक्षेला हातभार लागेल, असे मत ऊर्जा समितीच्या अध्यक्षा लिसा मुर्कोव्हस्की यांनी व्यक्त केले.