31 May 2020

News Flash

करोनावर या दोन औषधांचे कॉम्बिनेशन प्रभावी: अमेरिकेच्या डॉक्टरचा मोठा दावा

दोन औषधांचे हे कॉम्बिनेशन प्रत्येक रुग्णावर लागू पडल्यास निश्चित जगासाठी ती एक आनंदाची बाब ठरेल.

संग्रहित छायाचित्र

जगातील अनेक देशांचा आज करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. करोना व्हायरसला रोखू शकणारे प्रभावी औषध बनवण्यासाठी जगातील प्रमुख देशांमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. या दरम्यान अमेरिकेच्या कानसास शहरातील एका डॉक्टरने करोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी औषधांचे एक नवीन कॉम्बिनेशन बनवले आहे. हे औषध करोनावर प्रभावी असल्याचा या डॉक्टरचा दावा आहे. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे.

दोन औषधांचे हे कॉम्बिनेशन प्रत्येक रुग्णावर लागू पडल्यास निश्चित जगासाठी ती एक आनंदाची बाब ठरेल. Covid-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या दोन औषधांचा वापर करत आहेत असे डॉक्टर जेफ कोलयर यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील लेखात म्हटले आहे.

एझेड म्हणजे अ‍ॅझीथ्रोमायसीन हे दुसरे औषध आहे. बाजारात हे औषध झेड-पॅक म्हणून ओळखले जाते. Covid-19 च्या १४ रुग्णांना फक्त हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध देण्यात आले. त्यातील सहाव्या दिवशी ५७ टक्के रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. पण करोनाच्या सहा रुग्णांना हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन ही दोन्ही औषधे देण्यात आली. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी ठरला. सर्वच्या सर्व सहा रुग्णांचा सहाव्यादिवशी करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असे वॉशिंग्टन पोस्टने आपल्या लेखात म्हटले आहे.

ही दोन्ही औषधे अनेक वर्षांपासून वापरात आहेत. फक्त यावेळी ती एकत्र वापरण्यात आली हा फरक आहे. करोनाच्या रुग्णांवर या दोन्ही औषधांचे मिश्रण इतके कसे प्रभावी ठरतेय ते अजून लक्षात आलेले नाही असे डॉक्टर जेफ यांनी म्हटले आहे. एचसी या औषधाचा दीर्घकालीन वापर केल्यास डोळयांना त्रास होऊ शकतो असे डॉक्टर जेफ म्हणाले. सर्व औषधांचे साइड इफेक्ट असतात. एचसी सुरक्षित औषध आहे असे त्यांनी सांगितले.

भारतातही हे औषध वापरायला परवानगी
भारतातही राष्ट्रीय टास्क फोर्सने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध वापरण्याची शिफारस केली आहे. COVID-19 चा मुकाबला करण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापन केली आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरस विरोधात प्रभावी ठरत असल्याचे अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 5:07 pm

Web Title: us doctors identify promising drug combination for covid 19 treatment dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 मोदी सरकारचा मोठा निर्णय: वाहन कंपन्यांना व्हेंटिलेटर्स तयार करण्याचे निर्देश
2 धक्कादायक: परतलेल्या कामगारांना भररस्त्यात सॅनिटायझरनी घातली सामूहिक आंघोळ
3 लॉकडाउनमध्ये रिचार्जचं टेन्शन घेण्याची गरज नाही; प्रीपेड ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा?
Just Now!
X