News Flash

करोनामुळे ७ लाख लोक बेरोजगार, अमेरिकेतील अनेक लोकांवर आता पोटापाण्याचे नवे संकट

अमेरिका सरकारी धक्कादायक आकडेवारी

डोनाल्ड ट्रम्प यांचे वय किती आहे?

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या अमेरिकन लोकांवर आता बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. तेथील सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्या ७ लाख लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

अमेरिकेत करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्यांची संख्या ३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. शिवाय ८ हजारांपेक्षा अधिक जणांचा बळीही गेला आहे. करोना व्हायरसमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तेथेही काही प्रमाणात बंदी लागू असल्याने अर्थव्यवस्थेला धक्का बसू लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.

अमेरिकेच्या कामगार खात्याच्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात ७ लाक १ हजार लोकांचा रोजगार गेला आहे. शिवाय बेरोजगारीचा दरही ४.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. एवढंच नाही तर अद्याप करोना व्हायरसमुळे फटका बसलेल्यांची पूर्ण आकडेवारी यात समाविष्ट करणे बाकी आहे. ती झाल्यास बेरोजगारांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यात यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 1:29 pm

Web Title: us economy lost seven lakh jobs in march due to coronavirus pkd 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : पबजी २४ तास बंद राहणार
2 करोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’
3 आम्हाला मदत करा ! करोनाविरुद्ध लढ्यात ट्रम्पची मोदींना विनंती
Just Now!
X