अमेरिकेत टेड क्रूझ यांनी व्योमिंग प्रांतातील रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीची लढत जिंकली आहे. टेक्सासचे गव्हर्नर असलेल्या टेड क्रूझ यांना न्यूयॉर्कमधील प्राथमिक लढतीच्या आधी मिळालेला विजय हा महत्त्वाचा ठरला असून न्यूयॉर्कची लढत मंगळवारी होत आहे.  वादग्रस्त वक्तव्ये करणारे डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. ९ एप्रिलच्या लढतीत ट्रम्प यांना १ प्रतिनिधी मत मिळाले होते तर टेड क्रूझ यांना नऊ मते मिळाली. आताच्या आठवडा अखेरीस झालेल्या लढतीत  क्रूझ यांना १४ रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशन प्रतिनिधी मते मिळाली तर फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबियो यांना एक मत मिळाले. चार प्रतिनिधी मते कुणालाच मिळाली नाहीत. क्रूझ यांनी विजयानंतर सांगितले, की जर डोनाल्ड ट्रम्प हे उमेदवार नको असतील व निवडणूक हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने झुकू द्यायची नसेल, तर सभ्य स्त्री-पुरुष हो मला मते द्या. क्रूझ यांच्या विजयाने त्यांच्या प्रचारातील नियोजन चांगले होत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांना उमेदवारी मिळण्यासाठी लागणारा १२३७ हा आकडा गाठू न देण्याच्या दृष्टीने क्रूझ यांची पावले आहेत. शनिवारी व्योमिंगमध्ये मिळवलेला विजय महत्त्वाचा आहे. ट्रम्प यांनी व्योमिंगमध्ये फारसा प्रचार केला नव्हता पण त्यांना ८ नोव्हेंबरच्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीची उमेदवारी मिळणे कठीण जाऊ शकते.

 

rapper fazilpuriya loksabha
बॉलीवूड रॅपर, सापाच्या तस्करी प्रकरणात नाव आणि आता लोकसभेची उमेदवारी
Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
odisha bjp lok sabha campaign
अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर