अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक खासदार राजा कृष्णमूर्तींनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. २०१० पासून निवडणूक लढणाऱ्या कृष्णमुर्ति यांचा पहिल्याचा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ते २०१६ साली दुसऱ्या प्रयत्नात निवडूण आले होते. त्यानंतर आता पुन्हा ते निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे ते आता ते दुसऱ्यांदा अमेरिकेतील निर्वाचित सदस्यांच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये दिसणार आहेत.

बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंतच्या (भारतीय प्रमाणवेळ) मतमोजणीनुसार ४७ वर्षीय कृष्णामूर्ति यांना ७१ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी लिबरटेरियन पक्षाचे उमेदवार प्रेस्टन नेल्सन यांचा पराभव केला आहे. दिल्लीत जन्मलेल्या कृष्णमूर्ति यांचे आई-वडील हे तामिळनाडूचे आहेत. असोसिएट फ्री प्रेसच्या आकडेवारीनुसार कृष्णामूर्ति यांना एक लाख ४६ हजारहून अधिक मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधकाला म्हणजेच नेल्सन यांना ६० हजार मतं मिळाली आहेत. म्हणजेच कृष्णामूर्ती यांनी दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारापेक्षा दुप्पटीहून अधिक मतं मिळवलीू आहेत.

याचबरोबर काँग्रेसच्या सदस्या प्रमिला जयपाल या वॉशिंग्टनमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या प्रेस्टन कुलकर्णी यांचा पराभव झाला आहे. टेक्साससारख्या मुख्य राज्यामधून कुलकर्णी निवडणूक लढवत होते. रिपब्लिकन उमेदावर ट्रॉय नेहल्स यांनी टेक्सासमधून विजय मिळवला आहे. नेहल्स यांना ५१ टक्के मते मिळाली तर कुलकर्णी यांना ४४ टक्के मते मिळाल्याचे असोसिएट प्री प्रेसने म्हटलं आहे.

मंगळवारी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. करोनाचं संकट असलं तरी यादरम्यान मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. याच निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली असून ट्रम्प व बायडेन या दोघांमध्ये अनेक ठिकाणी चुसशीची लढत दिसून येत आहे. एपी न्यूच्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी केंटकी, इंडियाना, ओकलाहोमा, टेनेसी, वेस्ट वर्जीनिया, नेब्रास्का, नॉर्थ और साउथ डाकोटा, यूटा, नेब्रास्का, लुइसियाना, साउथ कैरिलोना, अल्बामा, वायोमिंग, कंसास, मिसौरी, मिसिसिपी, ओहियो या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र बायडेन हे ट्रम्प यांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत. जो बायडन यांना २३७ इलेक्ट्रोल वोट मिळाले आहेत. तर ट्रम्प यांना २१० इलेक्ट्रोल वोट मिळाले आहेत.

अपेक्षेप्रमाणे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक ठरतानाचे चित्र दिसत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला आहे. पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण जिंकणारच होतो, म्हणजे आपण जिंकलोच आहोत” असे ट्रम्प व्हाइट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.