अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी आज (गुरूवार) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची भेट घेतली.
दरम्यान, यांच्या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्दयांवर चर्चा झाली हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. गोध्राकांडापश्चात उसळलेल्या दंगलीनंतर नरेंद्र मोदींचा व्हिसा अमेरिकेने नाकारला होता. यावर फेरविचार करण्यासही अमेरिकेने आतापर्यंत नकार दिला आहे. परंतु, या भेटीनंतर मोदींबद्दलच्या भूमिकेमध्ये अमेरिका बदल करण्याची शक्यता आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, मोदी आणि पॉवेल यांच्यात व्हिसा प्रकरणी चर्चा झाली नसून आगामी लोकसभा निवडणुका आणि दोन्ही देशांच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन याविषयी चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.